सोनचाफ्याच्या फुलांचं मला लहानपणापासूनच खूप कुतूहल वाटत आलं आहे. त्यांचा मंद मोहक वास, नाजुकपणा, सगळचं वेड लावणारं ...
आजीच्या परसात एक खूप उंच झाड होतं चाफ्याचं. फुलं दिसली की छपरावर शिडीने चढून आकड्यानं ती काढायची. यात शिडीने चढणे हा सगळ्यात मोठा गमतीचा भाग. चढताना सगळे चढायचे पटपट, उतरताना मात्र घाबरगुंडी उडायचीच कोणाचीतरी.
चाफ्याच्या झाडाला खूप खास वागणूक मिळायची. म्हणजे आजीची देवपूजा झाली की देवांच्या आंघोळीचं तबकातलं पाणी "चाफ्याला घाल हं " असं आजी मुद्दाम सांगायची. निर्माल्यपण चाफ्यालाच. इतकचं काय तर multivitamin च्या गोळ्यासुद्धा पचवल्यात चाफ्यानं.
मग रोजचा उद्योग फुलं आली आहेत का पाहणे. कधी एखाद्या फुलाबरोबर चुकून कळी खुडली जायची तेव्हा केवढी हळहळ वाटायची. ओंजळीत फुलं घेतली की हातांना येणारा वास, अजूनही येतो आठवणींबरोबर ... त्याच चाफ्यासाठी ...
एक नाजुक चाफा आहे माझ्या परसात,
बोलतो कधीतरीच हसतो मात्र गालात
वाऱ्याबरोबर त्याची गट्टी जमते खास,
त्याच्यासंगे दरवळत मग भटकून येतो झकास
उंचीचं आहे याला भारी वेड,
सोनेरी रंगांचे रोज उन्हा संगे खेळ
तुझी सळसळ जरी ऐकू येत नाही आज,
नाव घेताच वासमात्र येतोच हमखास
तुझ्या कवितेमधल्या शब्दाप्रमाणे एकदम झक्कास जमला आहे हा लेख. माझ्या आजोळी असाच एक जुईचा वेल होता, त्याची फूलं वेचायाला आमची भावंडांची अशीच मस्ती चालायची, त्याची आठवण झाली. मस्त असंच लिहित रहा आणि पोस्ट करत रहा.
ReplyDeletemastach...tujhe lekh chote aani interesting asatat...tyamule avadtat...keep writing ..short ones :)
ReplyDeleteMast lihilayas...!!!
ReplyDeleteDhanyawad Madhura, Rajesh, Swanand :)
ReplyDeleteमस्त !!! वाचून खूप छान वाटले
ReplyDeleteSahi.. chhan lihila :)
ReplyDeletemultivitamin च्या गोळ्या :D